LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची झळाळती कामगिरी*

पाँडिचेरी आणि केरळ येथे पार पडलेल्या 54व्या राष्ट्रीय केंद्रीय विद्यालय तसेच CBSE दक्षिण विभागीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत राज्याचा मान उंचावला आहे. या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध राज्यांतील तब्बल 700 हून अधिक अव्वल स्केटर्सनी सहभाग नोंदवला होता.

बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी एक सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदके पटकावून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.

🥇 पदक विजेते स्केटर्स:

सौरभ साळोखे – 1 सुवर्ण, 1 रौप्य

अनघा जोशी – 1 रौप्य

सत्यम पाटील – 1 कांस्य

प्रांजल पाटील – 1 कांस्य

ही सर्व युवा प्रतिभावान स्केटर्स KLE Society Skating Rink, Good Shepherd Skating, आणि Shivganga Skating Rink येथे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.

त्यांच्या यशामागे डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि कर्नाटका रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांचे प्रोत्साहन लाभले आहे.

या खेळाडूंनी केलेल्या कामगिरीने बेळगावचा क्रीडाक्षेत्रातील दर्जा आणखी मजबूत केला असून, पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*