LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या मयांक हलदरची सुवर्णकामगिरी*

चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय एशिया पॅसिफिक डाऊन सिंड्रोम फेडरेशन आयोजित जलतरण स्पर्धेत बेळगावच्या मयांक हलदर याने उल्लेखनीय कामगिरी करत भारताचे प्रतिनिधित्व करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. या स्पर्धेत भारतासह तब्बल दहा देशांतील जलतरणपटूंनी सहभाग नोंदवला होता.

मयांक हलदर याने ५० मीटर फ्रीस्टाइल आणि २५ मीटर बॅक स्ट्रोक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामुळे बेळगाव शहराचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उंचावला आहे.

या ऐतिहासिक यशानंतर मयांक हलदर याचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन होताच आबा स्पोर्ट्स क्लब, हिंदी स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी मयांकचे आई-वडील, त्याचे जलतरण प्रशिक्षक श्री. विश्वास पवार यांच्यासह विशाल वेसने, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, सुधीर धामणकर, मोहन पत्तार, सूर्यकांत हिंडलगेकर, पद्मप्रसाद हुली, गणेश दडीकर, हर्षाली पाटील, अनंत पाटील तसेच अनेक क्रीडाप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.

मयांकच्या या यशामुळे विशेष गरजा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, त्याची कामगिरी आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरणारी आहे, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*