Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*“बेळगावच्या जलतरणपटूंची राज्यस्तरीय पॅरा स्पर्धेत सुवर्ण झळाळी”*

बेळगाव :
बेंगलुरू येथील झी स्विमिंग अकॅडमीत नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य पॅरा जलतरण संघटनेच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूंनी आपल्या कौशल्याची चमक दाखवत तब्बल १० सुवर्ण आणि ५ रौप्य पदकांचे घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत

कुमार ओम जुवळी यांनी १ सुवर्ण व २ रौप्य,

कुमार शुभम कांबळे यांनी २ सुवर्ण व १ रौप्य,

कुमार मयांक हलदर यांनी १ सुवर्ण व २ रौप्य,

कुमार विशाल पवार यांनी १ सुवर्ण,

कुमारी संचिता सातपुते यांनी ३ सुवर्ण,

तर कुमारी आरोही सुरतकर यांनी ३ सुवर्ण पदकांची कमाई केली.

बेळगावचा हा जलतरण चमू गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावात नियमित सराव करतो. त्यांना एन.आय.एस. प्रशिक्षक विश्वास पवार, तसेच रणजीत पाटील आणि विशाल वेसणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या जलतरणपटूंनी केलेली ही कामगिरी बेळगावसाठी अभिमानास्पद ठरली आहे.

या उल्लेखनीय यशामुळे बेळगावच्या पॅरा जलतरण क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धांमध्येही हे खेळाडू चमक दाखवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*