Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कोल्हापूरच्या खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सची दणदणीत कामगिरी*

कोल्हापूर येथे सचिन टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवसमर्थ खुल्या स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत राज्यातील विविध भागांतून 300 हून अधिक नामवंत स्केटर्सनी सहभाग नोंदवला होता.

या अटीतटीच्या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी सात सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण बारा पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

🥇 पदक विजेते खेळाडू

जानवी तेंडूलकर – 2 सुवर्ण

शल्य तरळेकर – 2 सुवर्ण

सौरभ साळोखे – 2 सुवर्ण

आरशान माडीवाले – 1 सुवर्ण, 1 कांस्य

अमिषा वेर्णेकर – 2 रौप्य

प्रीतम बागेवाडी – 2 रौप्य

हे सर्व खेळाडू के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे नियमित सराव करत असून प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश संपादन केले आहे.

तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी आणि प्रसाद तेंडुलकर यांचे प्रोत्साहन व पाठबळ या खेळाडूंना लाभत असल्याचे सांगण्यात आले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*