LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*7 व 8 फेब्रुवारीला तिसरी पीव्हीआर निमंत्रित जलतरण स्पर्धा*

बेळगाव : आबा व हिंद स्पोर्ट्स क्लब तसेच क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रित जलतरण स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शनिवार दिनांक 7 आणि रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी गोवावेस महानगरपालिकेच्या जलतरण तलावात पार पडणार आहेत.

या स्पर्धांमध्ये मुला व मुलींच्या विविध वयोगटांतील जलतरण स्पर्धांचा समावेश असणार असून, बेळगावसह बेंगलोर, गोवा, कोल्हापूर, पुणे, सांगली, हुबळी व धारवाड येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले जलतरणपटू सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचे आयोजन उच्च दर्जाचे ठेवण्यासाठी सर्व आवश्यक क्रीडा निकष व सुरक्षिततेची काळजी घेतली जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. या स्पर्धांमुळे बेळगाव शहराला जलतरण क्रीडाक्षेत्रात नवी ओळख मिळणार असून नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.

या संदर्भात माहिती देताना आबा स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक व स्पर्धेचे इव्हेंट डायरेक्टर श्री. विश्वास पवार यांनी सांगितले की, या स्पर्धा केवळ स्पर्धात्मक नसून, जलतरण क्रीडेला प्रोत्साहन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहेत.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*