LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*४१व्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सचा विजयसोहळा*

बेळगाव :
क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा बेळगावच्या स्केटिंगपटूंनी आपला ठसा उमटवला आहे. ४१व्या राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सनी एकूण २० पदकांची झोळी भरली, त्यात ६ सुवर्ण, ६ रौप्य आणि ८ कांस्य पदकांचा समावेश आहे.

या स्पर्धा बेंगळुरूमध्ये पार पडल्या असून, कर्नाटकातील ६०० हून अधिक टॉप स्केटर्सनी त्यात सहभाग घेतला होता. तगड्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये बेळगावच्या स्केटर्सनी केलेली ही कामगिरी लक्षणीय ठरली आहे.

🥇 पदक विजेते स्केटर्स:

सई पाटील – २ सुवर्ण

तीर्थ पाच्यापूर – २ सुवर्ण

प्रांजल पाटील – १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य

आर्या कदम – २ रौप्य, १ कांस्य

सत्यम पाटील – १ सुवर्ण

सौरभ साळोखे – १ रौप्य, २ कांस्य

अनघा जोशी – १ रौप्य, १ कांस्य

जानवी तेंडूलकर – १ रौप्य, १ कांस्य

अथर्व पी. – १ कांस्य

स्वयंम पाटील – १ कांस्य

या स्केटर्सनी आपला सराव के.एल.ई. सोसायटी स्केटिंग रिंक, गुड शेफर्ड स्केटिंग रिंक, व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे केला आहे.

🏅 मार्गदर्शन व प्रोत्साहन:

या यशामागे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन आहे. तसेच डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर व कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी इंदुधर सीताराम यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले.

या भव्य यशामुळे बेळगावचा क्रीडा दर्जा आणखी उंचावला असून, राज्य पातळीवरील पुढील स्पर्धांसाठी या स्केटर्सकडून अधिक चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*