LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत जीएसएस कॉलेज, बेळगावचा चमकदार विजय!*

बिदर :
दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी बिदर येथे झालेल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या एस. के. सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. या स्पर्धेत जीएसएसच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ सादर करत द्वितीय पारितोषिकासह प्रमाणपत्र आणि पदक पटकावले.

या स्पर्धेसाठी बेळगाव, बेंगळुरू, कारवार, मंड्या आणि कोलारसह राज्यातील विविध भागांतून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत जीएसएसच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दमदार खेळामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

टीम मॅनेजर म्हणून प्रा. अनघा वैद्य या संपूर्ण स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहून मार्गदर्शन करत होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संघभावना आणि कौशल्य दाखवत उत्कृष्ट यश संपादन केले.

या कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*