Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत स्वरानी गोरलची सुवर्णझेप; 40 किलो गटात पटकावले अव्वल स्थान*

 

बेळगाव : जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत सरकारी मराठी मुलांची शाळा क्रमांक 5, चव्हाट गल्ली येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कुमारी स्वरानी प्रसाद गोरल हिने उल्लेखनीय कामगिरी करत 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला. स्वरानीच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली असून तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आज पार पडलेल्या जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत स्वरानीने आत्मविश्वासाने आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. सुरुवातीपासूनच तिने उत्कृष्ट तंत्र, चपळाई आणि संयम दाखवत 40 किलो वजनी गटातील विजेतेपदावर आपले नाव कोरले.

स्वरानीने मिळवलेले हे यश तिच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीचे फलित मानले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या स्वरानीने जिल्हास्तरावर मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.

स्वरानीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेतील शिक्षक, गुरुजन तसेच क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केले. भविष्यातही तिने अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे गाठून शाळेचे, आई-वडिलांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

शाळेच्या सर्व गुरुजनांकडून कुमारी स्वरानी प्रसाद गोरल हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव विशेष वार्तांकन शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी ‘मॉन्टी फाउंडेशन’चा निर्धार!* *मातृभाषेतील शिक्षणाला प्रोत्साहन देणे गरजेचे : अविनाश भोसले**महादान २०२६’ अंतर्गत रक्तदानासह अवयवदान, नेत्रदान व देहदान जनजागृती अभियान विनायक नगर येथे २० सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन**सायबर सुरक्षेचा धडा! मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य**22 वी खुल्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीची छापेमारी; कर्नाटक-महाराष्ट्रात सुमारे 15 ठिकाणी झडती*देवन बामणेची विश्वविजयाकडे झेप!श्री गणेश फेस्टिव्हलचा आज सांगता सोहळा; बेळगावातील नवरत्नांचा होणार गौरव*अपघातात जखमी झालेल्या शांताताईंची प्रकृतीची लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली विचारपूस**नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट; बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी**बेळगाव शहरासाठी १५० BSNL 4G टॉवर्सची मागणी; खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन*