Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*आजी माजी लोकप्रतिनिधींच्या सुंदोपसुंदीतुन खानापूर तालुक्यातील जनतेने बोध घ्यावा*

 

खानापूर तालुक्यातील मराठीप्रेमी,प्रामाणिक तसेच साध्याभोळ्या जनतेला माझे आवाहन आहे की, तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी आपापसात सुंदोपसुंदीचा दिखावा करून सामान्य जनलेला व कार्यकर्त्यांना पुन्हा द्वेषाच्या राजकारणात ढकलण्याचा प्रयत्न करत आहे,  म.ए.समिती वगळता तालुक्याचा विकास साधण्यात ते सपशेल फेल गेले आहेत त्याच बरोबर तालुक्यात मराठी भाषेला व संस्कृतीला प्राधान्य क्रम देण्यातही ते कमी पडले आहेत. विद्यमान लोकप्रतिनिधीकडे तालुक्याची धुरा तर माजी लोकप्रतिनिधिंच्या पक्षाचं सरकार आहे मग तालुक्याचा विकास थांबलाय कुठं हे यांनी जनतेला सांगावं.

जिल्हा बँकेच्या पत धोरणावरून विद्यमान विधान परिषद सदस्यांनी माजी लोकप्रनिधींवर आरोप लावला, तर माजी लोकप्रतिनिधींनी याला राजकारणाचं लेबल लावलं.  लोकसभेत एक तर विधानसभेत एक त्याच बरोबर जिल्हा बँकेत वेगळीच युती तर जिल्हा, तालुका व ग्राम पंचायतीच्या निवडणूका आल्या की वेगळच समर्थन करून वेळ आली की कार्यकर्त्यांच्या मध्ये संभ्रम पसरून त्यांच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम हे सर्वजण करत आहेत. एकांकडे तालुक्याची धुरा मोठ्या विश्वासाने दिली आहे तर दुसरीकडे राज्यात सरकार त्यांच्याच पक्षाचं असताना श्रेयवादाची लढाई कशासाठी असा प्रश्न आम्ही करीत आहोत.

निवडणुकीत कोण जिंकेल कोण ठरेल पण या द्वेषाच्या राजकारणाला आता खानापूर तालुक्याच्या शांत संयमी जनतेने बळी न पडता आपली,मराठी भाषा संस्कृती तसेच तालुक्याची प्रगती साधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे,असे आवाहन मी करीत आहे.

त्याच बरोबर मी तालुक्याचे विद्यमान आमदार श्री.हलगेकर साहेब यांना विनंती करतोय की शिक्षक भरतीत आपण ज्या रिक्त मराठी  शिक्षकांच्या जागांची मागणी सरकारकडे केली आहे त्याचा पाठपुरावा करून त्वरित त्यांनी मराठी Ded व Bed पात्र मराठी उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*आजी माजी लोकप्रतिनिधींच्या सुंदोपसुंदीतुन खानापूर तालुक्यातील जनतेने बोध घ्यावा*राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त बेळगावात वन कर्मचाऱ्यांना आदरांजली*बेळगावच्या इंद्रजीत हलगेकरांचा आयर्नमॅन पराक्रम; २२६.२ किमीचा प्रवास १३ तासांत पूर्ण** जिल्हास्तरीय हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेला विजेतेपद  विजेतेपद**जिल्हा स्केटिंग असो तर्फे खुल्या राज्यस्तरीय रँकिंग स्केटिंग स्पर्धेचे आयोजन* *खानापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत मणतुर्गा हायस्कूल विद्यार्थिनींना सर्वसाधारण विजेतेपद* *बेळगाव काँग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक बदल; ग्रामीण अध्यक्षपदी बसवराज शेडगावी, शहराची धुरा राजा सलीम यांच्याकडे**रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे ‘गुरू गौरव’, आर्थिक साक्षरता व आरोग्य उपक्रम**उद्यमबाग पोलिसांची मोठी कारवाई; वाहनचोरी प्रकरणातील आरोपी अटकेत, २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त**ईडी कारवाईविरोधात हिरेबागेवाडीत काँग्रेसचे आंदोलन; परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने*