चंद्र स्वारीसाठी ‘इस्रो’ पुन्हा सज्ज
जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान- ३ च्या प्रक्षेपणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अंतराळयान यूआर राव उपग्रह केंद्रात पेलोडस्च्या अंतिम असेम्ब्लिंगच्या तयारीत आहे. यान प्रक्षेपणाची अंतिम तारीख अजून ठरलेली नाही. तथापि, जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात इस्रो चांद्रयान ३ चे प्रक्षेपण करू शकते.
चांद्रयान- ३ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावरील वातावरणाच्या गुणधर्मांचा आणि लैंडिंग साइटच्या आसपासची मूलभूत रचना यांचा अभ्यास करण्यासाठी खास वैज्ञानिक उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या मार्चमध्ये, चांद्रयान- ३ अंतराळ यानाने यशस्वीरीत्या आवश्यक चाचण्या पूर्ण केल्या. या चाचणीत यानाने प्रक्षेपणाच्या वेळी अंतराळ यानाला सामोरे जाणाच्या कठोर कंपने आणि ध्वनिविषयक वातावरणाचा सामना करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. हे चांद्रयान तीन यंत्रणांचे मिश्रण असून त्यात
प्रोपल्शन, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतातील सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान-३ हा चांद्रयान-२ मोहिमेचा पाठपुरावा आहे.
चांद्रयान ३ मोहिमेचे उद्दिष्ट प्राथमिक उद्दिष्ट अचूक लँडिंग हे असणार आहे. त्यासाठी नवीन उपकरणे तयार करणे आणि अन्य दक्षता घेणे यावर काम सुरू असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली. इस्रोने सीई २० या क्रायोजेनिक इंजिनची उड्डाण स्वीकृती चाचणी पूर्ण केली आहे.
4g7lnf
pi7a8c