भाजप सरकारला 9 वर्ष पूर्ण
15 मे ते 15 जून असा महिनाभर जनसंपर्क अभियान भाजप पक्ष राबविणार आहे. मोदी सरकारला सत्तेत येऊन नऊ वर्षे पूर्ण झाले असल्याने मोदी सरकारने या जनसंपर्क अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात भाजप बद्दल काय भावना आहे? याची माहिती भाजप सरकार घेणार आहे.
सदर अभियान खासदार आणि आमदारांना आपल्या मतदारसंघात राबविण्यात सांगण्यात आले आहे या अभियानांतर्गत भाजपचे खासदार शिक्षक वकील खेळाडू कलाकार व्यापारी यांच्या संपर्कात राहणार आहेत तसेच मोदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची संपर्क साधण्यास सांगण्यात आली आहे.
तसेच देशभरात येणाऱ्या नव्या निवडणुकीकरिता भाजप नवीन मतदारांना आकर्षित करण्याकरिता प्रयत्न करणार आहे. तसेच याकरिता सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आदींची संपर्क साधण्यास सांगितले आहे
नऊ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकार समोर अनेक आव्हान होती. पहिल्या पाच वर्षात त्यांनी आव्हानांचा सामना करत नागरिकांच्या विकासाचा स्वप्न दाखल अनेक योजना पूर्ण केल्या आणि तसेच अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.
मोदी सरकारने अनेक विशेष कार्यक्रमाने उपक्रम राबविल्या असल्याने 2019 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आले आणि आता या सरकारला जवळपास नऊ वर्षे पूर्ण होत आहेत आता येणार काळात सुद्धा भाजप आपली सत्ता कायम राहावी याकरिता अनेक अभियान राबवत आहे नागरिकांच्या मनात नेमकी भाजप बद्दल काय भावना आहे? याची सविस्तर माहिती घेत आहे आणि त्यानुसार येणाऱ्या काळात भाजप निवडणूक लढणार आहे.