This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

April 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पिरनवाडीत 26 फेब्रुवारीला जंगी कुस्तींचा थरार* 

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

*लाल मातीत घुमणार शड्डूचा आवाज; पिरनवाडीत 26 फेब्रुवारीला जंगी कुस्तींचा थरार*

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज कुस्ती संघटना व शादरुद्दीन दर्गा उरूस कमीटी अयोजित २६ फेब्रुवारी ला पिरनवाडी येथे भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार होणार आहे.

स्पर्धेसंदर्भात पूर्व तयारी करण्यासाठी आज (गुरुवारी) कुस्तीगीर कार्यालय संघटनेची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आप्पाजी मुचोंडीकर, सेक्रेटरी सचिन गोरले, उधोगपती सतीश पाटील, ग्राम पंचायंत अध्यक्ष राकेश तळवार, वरिन्द्र मुचोंडिकर ,मल्लाप्पा उचगावकर, मोहन शास्त्री, सुधाकर देसाई, अप्पाय्या नानापा पाटील, अनसार हुबळीवाले, इंतीयाज बडीजरवाले, लथीप डी मुजावर, युनूस मुजावर, मुन्ना नंबिवाले, राजू पाटील, वैजू पाटील, महावीर पाटील, अप्पाना पाटील, आदी यावेळी उपस्थित होते. उरूसाचे निमित्त आयोजित प्रती वर्षा प्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती जसा पट्टी व गुरुप्रीत सिंग दिल्ली ( भारत केसरी) यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पालंदर मथुरा यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चांम्पियन बाळू बोकडे व हॅम्पी पंजाब यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी कार्तीक काटे व राकेश कुमार ( पंजाब) यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती संगमेश (मठपती आकाडा ) व विक्रम भोसले यांच्यात, सहाव्या क्रमांकाची कुस्ती शिवाय्या पूजारी वि. विनय मांडवे याशिवाय 50 हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या कुस्तीचा थरार पाहण्यासाठी सर्वासाठी खुले आहे सर्वांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन शिव सेना तालुका प्रमुख व कुस्ती संघटनेचे सेक्रेटरी सचिन गोरले यांनी केले आहे.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now