बेळगांव:मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने नियोजित कुस्ती आखाड्या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी महत्त्वाची बैठक बोलाविण्यात आली होती.बैठकीच्या अध्यक्षस्थानी पैलवान मारुती घाडी हे होते.बैठकीच्या सुरुवातीला उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिरालाल चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
पुढील वर्षी रविवार दिनांक ५ जानेवारी २०२५ रोजी आखाडा भरवण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले.यावेळी परशुराम नंदीहळ्ळी, अशोक हलगेकर, विलास घाडी, मारूती घाडी, संतोष होंगल आदींनी आपले विचार मांडले.बैठकीला नवरतन सिंग पनवार, मल्लाप्पा हिंडलगेकर, भरमा पूजनगौडा, विनोद चौगुले, दुंडेश एम, पप्पू हलगेकर, अतुल शिरोळे, मनोहर गावडा, तानाजी हलगेकर, भोमेश बिर्जे, महादेव पाटील, सुहास हुद्दार उपस्थित होते.