उड्डाण पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाला होणार सुरुवात
टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट येथील उड्डाणपूलाच्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणी क्रेनसह मोठ्या प्रमाणात बांधकामाचे साहित्य दाखल झाले आहेत.
येथील पुलाचे ठिकाणी बांधकामाचे साहित्य येण्यास सुरुवात झाली असल्याने तिसऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूच्या दुपदरी करण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
येथील कामाकरिता आरोबीसी खर्च रुपये 27.28 कोटी दोन्ही भागांसाठी मंजूर झाली आहेत. तसेच मेसर्स कृषी इन्फोटेक रेल्वे मंत्रालय आणि कर्नाटक सरकारी यांच्यात 50: 50 खर्च विभागणी आधारावर या रस्ता उड्डाणपुलासाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.