This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

CrimeLocal News

*विद्यार्थीनिशी गैरवर्तन करणाऱ्या बस चालकाविरुद्ध कठोर कारवाई करा*

*विद्यार्थीनिशी गैरवर्तन करणाऱ्या बस चालकाविरुद्ध कठोर कारवाई करा*

विद्यार्थीनिशी गैरवर्तन करणाऱ्या बस चालकाविरुद्ध कठोर कारवाई करा

बेळगाव जवळ असणाऱ्या एका गावातील सत संस्कार करून विद्यार्थी घडवणाऱ्या शाळेच्या बस चालकाने तीन अल्पवयीन विद्यार्थीनिशी गैरवर्तन केल्याची तक्रार पालकांनी केली आहे.बेळगाव हून अनेक विद्यार्थी या शाळेला जातात.शाळेला जाण्यासाठी शाळेने बसची व्यवस्था केली आहे.बसमधून शाळेला ये जा करणाऱ्या तीन विद्यार्थिनींशी बस चालक आकाश पाटील याने गैरवर्तन केल्याची तक्रार पालकांनी शाळेच्या प्रिन्सिपॉल आणि मुख्याध्यापिकेकडे केली आहे.

तक्रारीचे गांभीर्य ध्यानात घेऊन आकाश पाटील या बस चालकाला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.या संबंधी पालकांनी शाळेच्या प्रिन्सिपॉल आणि मुख्याध्यापिकेकडे विचारणा केली असता योग्य उत्तर दिले नाही.त्यामुळे ज्योती कत्ती यांनी वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून त्यांना बोलवून चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या बस चालकाला कामावरून काढून शाळेने कारवाई करणे टाळले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

तसेच पालक वर्गांनी आक्रमक भूमिका घेतल्याने शाळेचे प्रिन्सिपल बस चालकाविरुद्ध आणखी कारवाई करू असे आश्वासन यावेळी दिले.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply