This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

March 2025
S M T W T F S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

| Latest Version 9.4.1 |

National

*महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनां पीएम किसान योजनेअंतर्गत 5600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित*

*महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनां पीएम किसान योजनेअंतर्गत 5600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित*
D Media 24

महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनां पीएम किसान योजनेअंतर्गत 5600 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

नवी दिल्ली 02 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत वर्ष 2022-23 साठी महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना 5 हजार 654 कोटी पेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याचे माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान)योजना ही केंद्रीय क्षेत्रातील सर्वात मोठी योजना असून देशातील भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पुरवण्यासाठी 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, दर वर्षी 6000 रुपयांचा आर्थिक निधी तीन समान भागांमध्ये विभागून शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केला जातो. आतापर्यंत देशभरातील 11 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेतून 2 लाख 60 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरीत करण्यात आली असून महाराष्ट्र राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना आतापर्यंत 24093.431 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत राज्याच्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 436.815 कोटी, वर्ष 2019-20 मध्ये 4,898.806 कोटी, वर्ष 2020-21 मध्ये 6671.801 कोटी , वर्ष 2021-22 मध्ये 6431.384 कोटी तर वर्ष 2022-23 मध्ये 5654.625 कोटी रुपये इतकी रक्कम हस्तांतरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.

सातारा जिल्ह्यातील पीएम-किसान सन्मान निधी लाभार्थ्यांना 1295.95 कोटी रुपयांचे वितरण

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात, एकूण मंजूर आणि सत्यापित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) पात्र लाभार्थ्यांची संख्या 5,49,385 आहे आणि योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत या लाभार्थ्यांना 1,252.95 कोटी रुपये वितरित करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत दिली.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

2 Comments

  • Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point. You obviously know what youre talking about, why waste your intelligence on just posting videos to your weblog when you could be giving us something enlightening to read?

  • Hello, Neat post. There’s a problem along with your site in internet explorer, might check this?K IE nonetheless is the market leader and a good component to other folks will omit your excellent writing because of this problem.

Leave a Reply