Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा*

दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेकडे  इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांतर्फे रोपे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  शाळेचे शिक्षक गजानन सावंत उपस्थित होते.इयत्ता सातवीची विद्यार्थिनी ओजस्वी तानाजी गुरव हिने आपले मनोगत व्यक्त केले तर सोहम प्रताप बेळगुंदकर याने पर्यावरणासंबंधी कवितेचे वाचन केले. प्रमुख पाहुणे गजानन सावंत यांनी पर्यावरण संवर्धन आणि त्याची आजच्या स्थितीला गरज याविषयी माहिती दिली. यामध्ये झाडे लावा आणि त्यांची  निगा राखा, कचरा कचरापेटीतच टाका, प्राण्यांचे संरक्षण करा, पाण्याची, विजेची बचत करा असा मोलाचा सल्ला त्यांनी आपल्या भाषणात दिला.सातवीच्या विद्यार्थ्यांनी रोप लागवडीबरोबर प्लास्टिकऐवजी स्टील बाटल्या वापरण्याचा संकल्प केला. 

       कार्यक्रम यशस्वीतेसाठी  माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक संयोजक नीला आपटे, समन्वयक सविता पवार, शेती शिक्षक अरुण बाळेकुंद्री,शिक्षक वर्ग, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*1971 भारत-पाक युद्धातील वीर योद्धा सुभेदार दत्तात्रय नावर यांचे निधन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार**छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन बापट गल्लीत उत्साहात साजरा**आदित्यराज कॅपिटल कार्यालयाबाहेर गोंधळ; पत्रकारांशी वादानंतर पोलिसांचा हस्तक्षेप**जुन्या भाजी मार्केट परिसरात संशयित युवक अटकेत, धारदार चाकू जप्त**प्रेयसीच्या हत्येचे दुःख असह्य; वेदना वाढदिवशी प्रियकराची आत्महत्या**मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा**समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय?- डॉ.शेवडे यांचा सवाल**बेळगावात दोन नव्या पोलीस चौक्या सुरू; समर्थ सोसायटीचा सामाजिक उपक्रम चर्चेत**जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संत मीरा शाळेत वनमहोत्सव**सावगावमध्ये मराठी शाळेसाठी ग्रामस्थ एकवटले; कन्नड शाळेसाठी पर्यायी जागेचा निर्णय*