LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी*

बेळगाव :
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील पार्किंगमध्ये वाढत चाललेल्या सुरक्षाव्यवस्थेच्या त्रुटीचा आणखी एक प्रत्यय १८ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे आला. पार्किंगमध्ये उभी असलेली एक दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेली. ही संपूर्ण घटना तेथे बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आली आहे.

दुचाकीचे मालक सतीश मुतगेकर (रा. कंग्राळी KH) यांनी तत्काळ एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. मात्र पंधरा दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस किंवा समाधानकारक कारवाई न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे मुतगेकर यांनी सांगितले.

चोरीला गेलेल्या दुचाकीचा क्रमांक KA22Y6732 असून अद्याप चोराचा ठावठिकाणा लागलेला नाही. नागरिकांचा आरोप आहे की हॉस्पिटल परिसरासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा कडक असणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष न करता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जनतेकडून होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*