LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*वडगावात साकारला हुबेहूब राजगड; शिवप्रेमींची भेटीसाठी गर्दी*

वडगाव येथील संयुक्त पाटील गल्ली येथे स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याची अतिशय सुंदर व हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सीमानी साहेब यांच्या हस्ते, तसेच प्रमुख पाहुणे श्री. अशोक घगवे आणि श्री. सूरज जाधव यांच्या उपस्थितीत या राजगड प्रतिकृतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना अशोक घगवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. तरुण पिढीला शिवइतिहासाची ओळख व्हावी, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

गडावरील बुरुज, तटबंदी, माची, सदर आणि छोटी घरे अगदी बारीक-सारीक तपशिलांसह साकारण्यात आली आहेत. शिवरायांचा भव्य देखावा आणि राजगडाची माहिती देणारा फलक हे विशेष आकर्षण ठरत आहे. रात्रीच्या आकर्षक विद्युत रोषणाईत हा गड अगदी जिवंत भासत आहे.

उद्घाटनानंतर नागरिकांनी, शिवप्रेमींनी व लहान मुलांनी या प्रतिकृतीला भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले.

आयोजकांतर्फे सर्व शिवप्रेमींनी व नागरिकांनी आवर्जून एकदा या राजगडाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जय हिंद, जय महाराष्ट्र !

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ज्योती सेंट्रलचा फुटबॉलपटू ध्यानेश राज्यात अव्वल**मराठी माध्यमातील शिक्षक भरतीच्या जागा वाढवून अन्याय दूर करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन**कॅम्प परिसरासाठी ६ कोटींची विकासकामे; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते रस्ते-ड्रेनेज प्रकल्पांचा शुभारंभ**राज्यस्तरीय अनुसंधान स्पर्धेत बेळगावच्या बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालयाचा डंका; प्रथम क्रमांक पटकावला**ऑल इंडिया रेल्वे नेमबाजी स्पर्धेत राधिक बरालेला सांघिक कांस्यपदक**वडगावात साकारला हुबेहूब राजगड; शिवप्रेमींची भेटीसाठी गर्दी**छठपूजेनंतर प्रवाशांसाठी मोठी बातमी! LTT ते हुबळी वन-वे स्पेशल ट्रेन; बेळगावसह 15 स्थानकांवर थांबा**भोपाळच्या राष्ट्रीय परा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स क्लबचा जलवा; 11 जलतरणपटूंची दमदार कामगिरी**‘कल्याणम आरोग्य संमेलन’ला बेळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; जगदीश शेट्टर यांच्या हस्ते उद्घाटन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर मंथन**राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्समध्ये बेळगावच्या माधुरी पाटीलची चमक; 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक*