LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*ऑल इंडिया रेल्वे नेमबाजी स्पर्धेत राधिक बरालेला सांघिक कांस्यपदक*

*सेंट्रल रेल्वेच्या जनरल चॅम्पियनशिपमध्ये मोलाचे योगदान*

बेळगाव : कोलकाता येथील आसनसोलमध्ये पार पडलेल्या ५९ व्या अखिल भारतीय आंतररेल्वे नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत (59th All India Inter Railway Shooting Championship) सेंट्रल रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापुरच्या राधिका बराले (हवालदार) हिने उल्लेखनीय कामगिरी केली. १० मीटर एअर रायफल प्रकारात तिने सांघिक कांस्यपदक पटकावत रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रात बेळगावचा नावलौकिक वाढविला.

या स्पर्धेत राधिकाने अचूक नेमबाजी आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सेंट्रल रेल्वेच्या पदकप्राप्तीत महत्त्वाची भर घातली. विशेष म्हणजे, सेंट्रल रेल्वेला जनरल चॅम्पियनशिपचा मान मिळवून देण्यातही तिचे योगदान मोलाचे ठरले. तिच्या या यशामुळे रेल्वेच्या क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राधिकाच्या यशाचे कौतुक करताना उपस्थितांनी तिच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ज्योती सेंट्रलचा फुटबॉलपटू ध्यानेश राज्यात अव्वल**मराठी माध्यमातील शिक्षक भरतीच्या जागा वाढवून अन्याय दूर करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन**कॅम्प परिसरासाठी ६ कोटींची विकासकामे; आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते रस्ते-ड्रेनेज प्रकल्पांचा शुभारंभ**राज्यस्तरीय अनुसंधान स्पर्धेत बेळगावच्या बी. व्ही. बेल्लद विधी महाविद्यालयाचा डंका; प्रथम क्रमांक पटकावला**ऑल इंडिया रेल्वे नेमबाजी स्पर्धेत राधिक बरालेला सांघिक कांस्यपदक**वडगावात साकारला हुबेहूब राजगड; शिवप्रेमींची भेटीसाठी गर्दी**छठपूजेनंतर प्रवाशांसाठी मोठी बातमी! LTT ते हुबळी वन-वे स्पेशल ट्रेन; बेळगावसह 15 स्थानकांवर थांबा**भोपाळच्या राष्ट्रीय परा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्वीमर्स क्लबचा जलवा; 11 जलतरणपटूंची दमदार कामगिरी**‘कल्याणम आरोग्य संमेलन’ला बेळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; जगदीश शेट्टर यांच्या हस्ते उद्घाटन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर मंथन**राष्ट्रीय शालेय ॲथलेटिक्समध्ये बेळगावच्या माधुरी पाटीलची चमक; 400 मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक*