LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*महाजन अहवालावरून बेळगावात तणाव; संगोळी रायण्णा चौकात गोंधळ*


बेळगावातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न करत कन्नड संघटनांचे नेते Vatal Nagaraj यांनी महाजन अहवालाच्या समर्थनार्थ बेळगाव महानगरपालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत संगोळी रायण्णा चौकात आंदोलकांना रोखले आणि वाटाळ नागराज यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत वाटाळ नागराज यांनी महाजन अहवाल अंतिम मानण्याची मागणी करत महानगरपालिकेला २ जूनपर्यंत अल्टिमेटम दिला. ठराव मंजूर न झाल्यास राज्यव्यापी बंद पुकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या हलमिडी शिलालेखाच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून कन्नड संघटनांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. बेळगाव महानगरपालिकेने महाजन अहवालासंदर्भात ठराव मंजूर करावा, अन्यथा राज्य सरकारने महानगरपालिका बरखास्त करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा महानगरपालिकेकडे निघाला असताना पोलिसांनी संगोळी रायण्णा चौकात अडवला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही महिला आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत संताप व्यक्त केला.

सीमाभागात पुन्हा एकदा भाषा आणि सीमा प्रश्नावरून वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून येत आहे. कन्नड संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती चिघळू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे.
या घडामोडींनंतर आता Maharashtra Ekikaran Samiti पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे सीमाभागातील मराठी जनतेचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*