LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*शास्त्रीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला; पाच वर्षांच्या चिमुकल्याला चावा*

बेळगाव शहरातील शास्त्रीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, छत्रपती शिवाजी उद्यानाजवळ एका पाच वर्षांच्या मुलाला कुत्र्यांनी चावा घेतल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वोरोनिका भाटी असे या जखमी बालकाचे नाव असून, खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मूल जखमी झाले असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी उद्यान व आसपासच्या परिसरात १५ ते २० भटकी कुत्री नियमितपणे फिरत असतात. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सकाळी-संध्याकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीही या भागात अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, केवळ शास्त्रीनगरच नव्हे तर बेळगाव शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बंध, निर्जंतुकीकरण, पुनर्वसन व नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

या घटनेनंतर पालक वर्गात तीव्र चिंता व्यक्त केली जात असून, शहरातील उद्याने व सार्वजनिक ठिकाणी लहान मुलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*