महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि भागवत कुटुंबियांतर्फे उदयोन्मुख गायिका नाट्यकर्मी अनुष्का आपटे हिला 2026 सालचा, सई भागवत स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील श्रीराम लागू रंग अवकाश या ठिकाणी हा पुरस्कार समारंभ दि 23 नोव्हेंबर रोजी पार पडला. अनुष्काला ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री. चंद्रकांत काळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी मंचावर ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. मोहन आगाशे उपस्थित होते. उपस्थितांमध्ये प्रसिद्ध सिने समीक्षक श्री. समर नखाते हे सुद्धा होते. पुरस्काराचे स्वरूप 10,000 रु रोख व मानपत्र असे आहे.

