LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*ठेवीदारांच्या तक्रारीनंतर आदित्यराज कॅपिटलच्या कार्यालयावर छापा*

बेळगांव: ठेवीदारांची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात निधी उभारल्याचा आरोप असलेल्या आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेवर गुरुवारी प्रशासनाने कारवाई केली. उपविभागीय अधिकारी शरवण नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील भाग्यनगर परिसरातील कार्यालयाची तपासणी करत विविध आर्थिक कागदपत्रांची पाहणी केली.

प्राथमिक माहितीनुसार, संस्थेने आकर्षक परताव्याचे आश्वासन देत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्याचा आरोप आहे. मात्र, त्या ठेवींना आवश्यक सुरक्षा किंवा हमी न देता जमा झालेल्या निधीचा इतरत्र वापर करण्यात आल्याची तक्रार संबंधित यंत्रणांकडे करण्यात आली होती.

या प्रकरणी संस्थेविरोधात केपीआयडी तसेच बड्स सेलमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रशासनाने तपासाची सूत्रे हाती घेतली. त्यानुसार अधिकाऱ्यांच्या पथकाने कार्यालयात जाऊन आर्थिक व्यवहारांशी संबंधित नोंदी आणि दस्तऐवजांची छाननी केली.

कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, चौकशी पुढे सरकल्यानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*