बेळगाव:आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उचगाव जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून माजी कंग्राळी बी.के. ग्रामपंचायत सदस्य तसेच उचगाव महाशक्ती केंद्रप्रमुख प्रदीप पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, हा आपल्या कामाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.
गावातील मूलभूत सुविधा, शिक्षण, रोजगार, युवकांचे प्रश्न तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
“केवळ आश्वासने देण्यापेक्षा जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच माझे ध्येय आहे,” अशी भूमिका प्रदीप पाटील यांनी मांडली.
युवकांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि विकासकामांना गती देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
जनतेशी थेट संवाद, युवकांना साथ आणि विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, या भूमिकेसह प्रदीप पाटील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत.
🚩 आपला भूमिपुत्र… आपला माणूस!
जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी… विकासासाठी पुढे!

