LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*बालवीर विद्यानिकेतनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ; विद्यार्थ्यांनी घेतली क्रीडा शपथ*

*दोन दिवस रंगणार विविध क्रीडा प्रकार; ‘शाळा हा केवळ शिक्षणाचा नव्हे, तर संस्कारांचा परिवार’ – अशोक भानुदास घगवे*

बेळगुंदी | प्रतिनिधी

बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस विविध क्रीडा प्रकारांमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म. ए. स. प्रमुख सल्लागार अशोक भानुदास घगवे यांनी शाळेच्या भूमिकेवर भाष्य केले. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांसाठी एक परिवार आहे. शिक्षक विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शाळेचे संयोजक शंकर चौगुले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देत उद्घाटन करण्यात आले.

बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख अतिथी अशोक भानुदास घगवे यांच्या हस्ते क्रीडा ज्योत विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते निलेश काकतकर यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुंडलिक सुतार, नागोजी नाकाडी, गीता ढेकोळकर आणि हेमा हदगल यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गटप्रमुखांनी विविध ध्वज एकत्रित करून ते मान्यवरांकडे सुपूर्द केले.

विद्यार्थिनी प्रेरणा पाटील हिच्या नेतृत्वाखाली उपस्थित खेळाडू व विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेतली. खेळातील शिस्त, खिलाडूवृत्ती आणि संघभावना जपण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यानंतर बालवीर सोशल फाउंडेशनचे संचालक तसेच ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी (निपाणी) येथील शिक्षक जी. एस. पाटील यांच्या हस्ते फित कापून कबड्डीच्या मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर वार्षिक क्रीडा स्पर्धांना अधिकृत सुरुवात झाली.

या कार्यक्रमाला प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापुरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, क्रीडा शिक्षक गोविंद गावडे, एस. एन. जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी केले. सूत्रसंचालन नीता यल्लारी यांनी केले, तर अनुजा मुतगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दोन दिवस चालणाऱ्या या क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास विकसित होण्यास मदत होणार असून, शालेय जीवनात शिक्षणासोबत क्रीडेलाही महत्त्व देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
दिवाळीच्या खरेदीसाठी बेळगावची बाजारपेठ फुलली; आकाशकंदील, पणत्या अन् रांगोळीला मोठी मागणी*ऊस उत्पादकांना मोठा दिलासा! बेळगावात प्रथमच ‘नफा वाटप सूत्रा’नुसार ऊसदर निश्चित**दूध-बस भाडेवाढीवर अनिल बेनके आक्रमक; ‘दरवाढीतील पैसे जातात कुठे?’ असा सवाल**उचगाव जिल्हा पंचायतसाठी प्रदीप पाटील इच्छुक**धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त; उच्चांकी दरापेक्षा 18% घसरण, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी**बालवीर विद्यानिकेतनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ; विद्यार्थ्यांनी घेतली क्रीडा शपथ**दिव्यांच्या प्रकाशापेक्षा माणुसकीचा उजेड मोठा; Pahi Vibes Foundation ने बालगृहातील चिमुकल्यांसोबत साजरी केली दिवाळी**बाकनूर रोडवर महत्त्वाचे RFID स्कॅनर सापडले; मालकाने संपर्क साधण्याचे आवाहन**शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात मद्यविक्री बंद; आज सायंकाळी 4 पासून उद्या सकाळी 6 पर्यंत आदेश**दूध, दहीपासून बस तिकिटापर्यंत दरवाढ; किरण जाधवांचा सरकारवर हल्लाबोल*