Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*160 कोटींच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एकाला अटक*

 तब्बल 160 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात बेळगाव पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. APPEXX BIZCORP LLP या ट्रेडिंग कंपनीमार्फत तीन हजारांहून अधिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी कौजलगी, ता. गोकाक येथील अशोक वीरुपाक्षी बिसगुप्पी यांनी 13 जुलै 2026 रोजी रात्री 10.10 वाजता तिलकवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, बेळगावातील मंगळवार पेठ येथील रेणुका निवास अपार्टमेंटमध्ये संबंधित कंपनीचे कार्यालय सुरू होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, कंपनीच्या माध्यमातून तीन हजारांहून अधिक लोकांकडून सुमारे 160 कोटी रुपये गुंतवून घेण्यात आल्याचा आरोप आहे. सदर रक्कम शेअर बाजार, रिअल इस्टेट तसेच विविध स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच गुंतवणुकीवर अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे स्वीकारण्यात आले आणि त्यानंतर आर्थिक गैरव्यवहार व फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या तक्रारीच्या आधारे टिळकवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 85/2026 दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी BUDS कायदा, KPID कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी क्रमांक 6 अर्जुन महादेव वाघमारे (वय 36, रा. मांगनूर) याला ताब्यात घेतले. त्याला बंगळुरू येथील XCII अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र न्यायालय (CCH-93) समोर हजर करण्यात आले आहे.

या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू असून तपास अधिक वेगाने करण्यात येत आहे.

पोलिस आयुक्त, बेळगाव शहर; उपपोलिस आयुक्त (का. व सु.), उपपोलिस आयुक्त (अं. व वि.) तसेच खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तिलकवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

तपास पथकात PSI विश्वनाथ घंटामठ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल महेश पाटील, ए. व्ही. नीलप्पनवर, नागेंद्र तळवार, लाडजीसाब मुल्तानी, प्रेम पवार, श्रीकांत कुरबर तसेच टेक्निकल सेलचे कर्मचारी रमेश अक्की यांचा समावेश होता.

या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलिस आयुक्तांनी कौतुक केले आहे. दरम्यान, कथित 160 कोटींच्या गुंतवणूक प्रकरणातील आर्थिक व्यवहार, संबंधित व्यक्ती आणि इतर आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*अॅनिमियामुक्त बेळगावच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; चार दिवसांत 1,475 विद्यार्थ्यांची तपासणी**बेळगावच्या जलतरणपटूंचा जलवा! ‘वीर सावरकर चषक’वर स्विमर्स क्लबचा कब्जा**जेवढे ग्रेटफूल व्हाल तेवढे ग्रेट व्हाल- श्री प्रल्हाद वामनराव पै**चिक्कोडीत चालवादी समाजाची चिंतन-मंथन सभा; समाजाच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार**बेळगावमध्ये रेल्वेच्या धडकेत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; तानाजी गल्ली ओव्हरब्रिजजवळ घटना**निपाणीत मल्लेश चौगुले यांचा जल्लोषात सत्कार**160 कोटींच्या कथित गुंतवणूक फसवणूक प्रकरणात एकाला अटक**महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे OSD मंगेश चिवटे यांची शांतााई वृद्धाश्रमला भेट**सागर कोलकर यांच्यावर धार्मिक परिषदेची जबाबदारी; गोकाकमध्ये आदेशपत्राचे वितरण**रस्त्याच्या मधोमध उघडे ड्रेनेज; अपघाताची टांगती तलवार!*