LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुत्राच्या कार चालकावर चाकू हल्ला*

कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुत्राच्या कार चालकावर अज्ञातानी चाकू हल्ला केल्याची घटना बेळगावातील क्लब रोडवर घडली. कार चालक बसवंत कडोलकर (३२) याच्यावर अज्ञातानी चाकू हल्ला केला आणि ते घटना स्थळावरून लगेच पसार झाले.

चाकू हल्ला झालेल्या बसवंत याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या बसवंत याची स्थिती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.पैशाच्या व्यवहारातून चाकू हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओळखीच्या व्यक्तींनीच चाकू हल्ला केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा पुत्र अन युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर यांचा बसवंत हा कारचालक आहे.

https://youtube.com/shorts/dkvxsr8DtLA?si=LlR5toEjlpNcVHo3

चाकू हल्ल्याचे वृत्त कळताच मृणाल हेब्बाळकर यांनी हॉस्पिटलमध्ये जावून कार चालकाच्या प्रकृतीची चौकशी केली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. हल्ला झालेल्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पोलीस तपासत असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. कॅम्प पोलीस स्थानकात सदर घटनेची नोंद झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*