बेळगाव | प्रतिनिधी
कर्नाटक राज्य औद्योगिक विकास निगमच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री. मल्लेश अण्णा चौगुले यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स तसेच कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी मल्लेश अण्णा चौगुले यांना फेटा बांधून, शाल, हार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
या सत्कार समारंभाला डॉ. संजय अण्णा सुंठकर, नारायण चौगुले, अनिल आंबरोळे, राजेश लोहार, भारत बाळेकुंद्री, चेतन ताशीलदार, विजय चौगुले, प्रवीण कणबरकर, सुनील बोकडे, कुमार जाधव, दीपक कट्टीमनी (गोवा दलित राज्य अध्यक्ष), लॉरेन्स सिब्यास्टीन (झोनल हेड, कर्नाटक), मोहन कंग्राळकर, गणेश दड्डीकर, व्यंकटगिरी कुलकर्णी, लक्ष्मण कडोलकर, सुब्रमण्यम कांबळे आणि प्रवीण मुसळनारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मल्लेश अण्णा चौगुले यांच्या निवडीमुळे औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात तसेच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित विविध घटकांमध्येही सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत. उपस्थितांनी त्यांच्या नव्या जबाबदारीत उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

