Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शिवम असोसिएट्स प्रकरणात मोठी कारवाई; शिवानंद नीलण्णावर अटकेत*

बेळगावातील कथित गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणात मोठी घडामोड घडली असून, शिवम असोसिएट्सचे प्रमुख शिवानंद नीलण्णावर यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

माळमारुती पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, नोंदणीकृत नसलेल्या संस्थेमार्फत नागरिकांना जादा व्याज आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन आणि सहकार विभागाकडून शिवम असोसिएट्सशी संबंधित कार्यालयांवर संयुक्त कारवाई सुरू होती. अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि डिजिटल पुरावे जप्त केले.

शुक्रवारी कारवाईचा विस्तार करत अधिकाऱ्यांनी संस्थेशी संबंधित तीन कार्यालये आणि एक फ्लॅट सील केला. या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, अनेक गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांबाबत चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, आर्थिक व्यवहारांचे स्वरूप, निधीची हालचाल आणि गुंतवणूकदारांकडून जमा झालेल्या रकमेचा तपशील तपास यंत्रणा पडताळून पाहत आहेत. पोलिस आणि संबंधित विभागांकडून पुढील चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा