LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*केरळ सरकारचा ऐतिहासिक निर्णय : पदवीपर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत*

देशात शिक्षण महाग होत असताना केरळ सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांनी अर्थसंकल्प सादर करताना सरकारी तसेच सरकार अनुदानित महाविद्यालयांमधील आर्ट्स आणि कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली.

या निर्णयानुसार संबंधित विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासाठी कोणतेही शिक्षण शुल्क भरावे लागणार नाही. आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण अर्धवट सोडावे लागते. अशा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय मानला जात आहे.
देशभरात गुणवंत आणि प्रतिभावान विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडतात, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन केरळ सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. शिक्षण क्षेत्रात समावेशकता वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

शिक्षण सर्वांसाठी समान हक्काचे व्हावे, या विचाराला बळ देणारा हा निर्णय इतर राज्यांसाठीही आदर्श ठरेल का, याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*चन्नेवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई**कर्नाटक राज्योत्सवासाठी बेळगाव सज्ज! महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांकडून तयारीची पाहणी**बेळगावच्या सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे दक्षता पदक!**आशियाई पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वातिक पाटील यांचा बेळगावात भव्य सत्कार!**बद्रीनाथहून परतताना हेलिकॉप्टर कोसळले; बेळगावचे CCB निरीक्षक अरुण साळुंके यांच्यासह सहा जणांचा मृत्यू**१ नोव्हेंबर काळ्या दिनाची युवा समिती सीमाभाग तर्फे जनजागृती**पुणे विभाग समितीचे पुणे जिल्हाधिकाऱ्यासमोर,१ नोव्हेंबरला ‌धरणे सत्याग्रह* *पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या जलतरणपटूंचा दबदबा; ५७ सुवर्णपदकांसह ६९ पदकांची कमाई!**मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेसाठी स्वतंत्र दालन उभारणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही**बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये १०८ वा शरकत दिन उत्साहात; सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण*