Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*टिळकवाडीतील हॉटेल चोरीचा उलगडा; हुबळी येथील सराईत चोरटा जेरबंद*

बेळगाव | प्रतिनिधी
टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरपीडी सर्कलजवळ असलेल्या देशमुख रोडवरील एका हॉटेलमध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा तपास अखेर पोलीसांनी यशस्वीरीत्या उलगडला आहे. या प्रकरणी हुबळी येथील एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अविनाश रायरसंग (वय अंदाजे ३०, रा. विद्यानगर, हुबळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. संबंधित हॉटेलमध्ये चोरी झाल्याबाबत तक्रार दाखल होताच टिळकवाडी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला हुबळी येथून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून ८.४८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (किंमत अंदाजे ९५ हजार रुपये) तसेच ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
टिळकवाडी पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे शहरात कौतुक होत असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*