Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावात तरुणाची निर्घृण हत्या; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा हल्ला*


बेळगाव तालुक्यातील हुंच्यानट्टी गावाजवळ एका २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून हा हल्ला घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मजगाव येथील राहुल तलवार (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल याने काही काळापूर्वी एका खाजगी मेडिकल कंपनीत काम केले होते. आरोपींकडून त्याच्यावर संशयास्पद आणि बेकायदेशीर कामांमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात होता. मात्र राहुलने त्याला विरोध केल्याने दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला होता.

नातेवाईकांच्या माहितीनुसार, आरोपी मंजुनाथ हा कॉलेजमधील वादांमध्ये मध्यस्थी करून कमिशन घेण्याचे काम करत असे. त्याच्यासोबत राहुलचे कोणतेही मैत्रीपूर्ण संबंध नव्हते. काही आर्थिक व्यवहार पूर्ण करायचे असल्याचे सांगून आरोपींनी राहुलला हुंच्यानट्टी परिसरातील निर्जन जागी बोलावून घेतले.

राहुल घटनास्थळी पोहोचताच दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर तलवार आणि चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात राहुलच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

“पैशांच्या व्यवहाराचा बहाणा करून पूर्वनियोजित कट रचण्यात आला आणि राहुलची फसवणूक करून हत्या करण्यात आली,” असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मुख्य आरोपी मंजुनाथ शितीमणी आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त निपाणीत भव्य 'हिंदू एकता सभा**खानापूर येथील स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार**संदीप पाटील यांनी उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी पद स्वीकारले**बेळगावात तरुणाची निर्घृण हत्या; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा हल्ला**“मनापासून राजीनामा देतोय”; सिद्दरामय्या यांच्या वक्तव्याने कर्नाटकात खळबळ**एसडीआरएफच्या अधिकाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या**कागवाड पोलिसांची वेगवान कारवाई; ऐनापूर खून प्रकरणातील आरोपी अटकेत*कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना १ जूनला अभिवादन; मराठी बांधवांना उपस्थितीचे आवाहनस्कायवर्ड अकॅडमीतील विद्यार्थिनीची बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवर निवड*बेळगावच्या ३ वर्षीय नवतेजचा जागतिक विक्रम*