LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*50 दिवसांत सोनं 25% स्वस्त; गुंतवणुकीची संधी?*

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर तणाव वाढला की सोन्याच्या किमतीत उसळी येते, हा आतापर्यंतचा अनुभव. मात्र यावेळी चित्र पूर्णपणे वेगळं दिसत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याऐवजी मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, आज बाजार सुरू होताच 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹1,35,141 पर्यंत खाली आला. मागील बंद दराच्या तुलनेत सुरुवातीलाच जवळपास ₹12,000 ची घसरण नोंदवली गेली. चांदीच्या किमतीतही मोठी घट दिसून आली असून ती ₹2,01,500 प्रति किलोपर्यंत खाली आली आहे.

विशेष म्हणजे, मागील 50 दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत असून या कालावधीत जवळपास 25 टक्क्यांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे.

याआधी सोन्याने विक्रमी उंची गाठली होती. प्रति 10 ग्रॅम ₹1,76,121 हा उच्चांक गाठल्यानंतर आता किमतीत जवळपास ₹40,000 पेक्षा जास्त घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी सध्याचा काळ सोनं खरेदी करण्यासाठी योग्य असल्याची चर्चा बाजारात रंगू लागली आहे.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यावर पुढील काळातील सोन्याचे दर अवलंबून असतील.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*