Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*कागवाड पोलिसांची वेगवान कारवाई; ऐनापूर खून प्रकरणातील आरोपी अटकेत*


बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करण्यात कागवाड पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेत कारवाईची गती दाखवून दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ललिता सिद्धप्पा कमते यांनी कागवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, २६ मे रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ५.२० या कालावधीत ऐनापूर गावातील एका शेताच्या बांधावर त्यांचे भाऊ संतोष सिद्धप्पा कमते (वय ३८) यांचा अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला.

या प्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात बीएनएस २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन (IPS), अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी तसेच अथणी विभागाचे डीएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले.

सीपीआय संतोष हळ्ळूर यांच्या नेतृत्वाखाली आणि पीएसआय राघवेंद्र खोत यांच्या पुढाकाराने पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती, स्थानिक सूत्रे आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईमुळे परिसरात पोलिसांविषयी विश्वास वाढला असून, गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*“मनापासून राजीनामा देतोय”; सिद्दरामय्या यांच्या वक्तव्याने कर्नाटकात खळबळ**एसडीआरएफच्या अधिकाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या**कागवाड पोलिसांची वेगवान कारवाई; ऐनापूर खून प्रकरणातील आरोपी अटकेत*कन्नड सक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना १ जूनला अभिवादन; मराठी बांधवांना उपस्थितीचे आवाहनस्कायवर्ड अकॅडमीतील विद्यार्थिनीची बंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्टवर निवड*बेळगावच्या ३ वर्षीय नवतेजचा जागतिक विक्रम**मराठी विद्यानिकेतनला माजी विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षक यांची उदार देणगी**पहाटेपासून सफाई युद्ध; बेळगावात 1 टन प्लास्टिक कचरा हटवला**कटकॊळ पोलिसांची धडक कारवाई; ८ मोबाईल चोर जेरबंद**कर्नाटकात मोठी राजकीय उलथापालथ? सिद्धरामय्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग*