LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगावात अंतर्जातीय विवाहानंतर पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांवर आरोप*

बेळगावात अंतर्जातीय विवाहानंतर पत्नीची आत्महत्या; पतीसह कुटुंबीयांवर आरोप

बेळगाव तालुक्यातील मच्छे येथील विजय गल्ली परिसरात एका ३ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत विवाहितेचे नाव अनिता निलेश नंद्यालकर असे असून, तिने फक्त चार महिन्यांपूर्वीच आपल्या ७ वर्षांपासूनच्या प्रेयसी निलेशशी लग्न केले होते.

लग्नानंतर दाम्पत्य भाड्याच्या घरात राहत होते. मात्र अंतर्जातीय विवाहामुळे पतीच्या कुटुंबीयांकडून सतत जातिविषयक वाद, मानसिक छळ सुरू असल्याचे मृत मुलीच्या नातेवाईकांचे आरोप आहेत. काल रात्री पतीच्या घरच्यांपैकी चौघेजण घरी आले होते, त्यानंतरच अनिताचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला.

घटनास्थळी ग्रामीण एसीपी शेखरप्पा व पोलीस पथकाने भेट देऊन पाहणी केली असून, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दलित नेते प्रवीण मादर यांनी या घटनेवर संताप व्यक्त करताना, पतीने मारहाण करून अनिताला गळफास लावल्याचा आरोप केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

अनिताच्या नातेवाईक जन्नाबाई यांनी सांगितले की, "अनिता प्रेमसंबंधात असल्याचे कळल्यावर आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्याच्याशीच लग्न केले. आता ती आमच्यात नाही आणि त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला रस्त्यावर आणले आहे," असे त्यांनी भावनिक स्वरूपात सांगितले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*