Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*शिवम असोसिएटस् प्रकरणात मोठा खुलासा; CID च्या तपासात धक्कादायक माहिती*

बेळगाव
शिवम असोसिएटस् आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीत मोठा धक्कादायक खुलासा झाला आहे. प्राथमिक तपासात तब्बल 660 कोटी रुपयांची आर्थिक तूट आढळून आली असून सुमारे 40,700 गुंतवणूकदार या प्रकरणामुळे प्रभावित झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे.

बेळगाव येथील सर्किट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सीआयडीचे डीआयजी भीमाशंकर गुळेद यांनी तपासाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आकर्षक परताव्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा करण्यात आल्या. मात्र प्रत्यक्ष व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न निर्माण झाले नसतानाही नव्या गुंतवणूकदारांकडून आलेल्या रकमेतून जुन्या गुंतवणूकदारांना परतावा आणि व्याज देण्यात येत होते.

तपासात या व्यवहारांची रचना साखळी पद्धतीची असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध बँक खाती, स्थावर मालमत्ता, सोने, शेअर्स आणि इतर गुंतवणुकींची सखोल छाननी सुरू आहे.

तपास यंत्रणांना आतापर्यंत जवळपास 400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मागोवा लागला असून ती कायदेशीर प्रक्रियेद्वारे जप्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित खात्यांमधील व्यवहारांची तपासणी करताना अनेक आर्थिक देवाणघेवाणींची माहिती समोर येत आहे.

याशिवाय, महागड्या लक्झरी वाहनांसह विविध राज्यांत नोंदणीकृत मालमत्तेचाही तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार या संपूर्ण योजनेत सुमारे 2,400 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात लाभांश अथवा आर्थिक फायदा घेतलेल्या काही व्यक्तींनाही नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली असून चौकशीचा वेग वाढविण्यात आला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा