Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगाव हादरलं! ज्येष्ठ डॉक्टरांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या*


बेळगाव शहरात शुक्रवारी पहाटे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ (वय ७९) यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे रहिवासी होते. अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावल्यानंतर ते बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. शांत, साधे आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास त्यांनी आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडल्याचे समोर आले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

प्राथमिक तपासात दीर्घकाळाच्या आजारपणामुळे आणि मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, आत्महत्येमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कडोलीतील श्री मातंगी देवी मंदिराच्या विकासासाठी ₹10 लाखांचा निधी; स्लॅब पूजन संपन्नसरकारी माध्यमिक शाळा कल्लेहोळ येथे पालक मेळावा व माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्नकंग्राळी बी.के.चा विद्यार्थी शाळेतून बेपत्ता; नागरिकांना शोधासाठी आवाहनबेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारा