LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त*

बेळगाव शहरातील एपीएमसी पोलिसांनी वाहन चोरीच्या प्रकरणात जलद तपास करत अवघ्या 24 तासांत तब्बल 29 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

महाबळेश्वर हनुमाननगर परिसरातील रहिवासी प्रियांका चेतन अजरेकर यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली किआ सेल्टोस कार चोरीला गेल्याची तक्रार एपीएमसी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी महाराष्ट्रातील मुंबईपर्यंत धाव घेत चोरीस गेलेली किआ सेल्टोस कार हस्तगत केली. याच तपासात धारवाड सब-अर्बन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली हुंडाई क्रेटा कारही सापडली.

दोन्ही वाहने चोरी करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांमध्ये सुमारे 14 लाखांची किआ सेल्टोस आणि 15 लाखांची हुंडाई क्रेटा कारचा समावेश आहे.

या कारवाईत पीएसआय एस. के. होळेन्नवर, एएसआय एम. ए. पाटील तसेच पोलिस कर्मचारी डी. सी. सागर, बसवराज नरगुंद, गोविंदप्पा पुजार, रफीक मुजावर, शिवाजी चव्हाण आणि रमेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*