LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*युनियन जिमखान्यावर लष्कराचा ताबा; न्यायालयीन निर्णयानंतर अंमलबजावणी*

बेळगावातील युनियन जिमखाना येथे असलेल्या रमी क्लबमध्ये नुकत्याच घडलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर संरक्षण विभागाने मोठी कारवाई करत युनियन जिमखान्याला सील केले आहे. ही कारवाई लष्कर, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात पार पडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रमी क्लबमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. प्राथमिक स्तरावर हा प्रकार जुगार व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून घडल्याची चर्चा असली, तरी याबाबत अधिकृत तपास सुरू आहे.

दरम्यान, ज्या जागेवर युनियन जिमखाना कार्यरत होता ती संरक्षण विभागाची मालमत्ता असल्याचे सांगितले जाते. या जागेचा भाडेपट्टा (लीज) 2002 मध्ये संपुष्टात आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.

अलीकडेच न्यायालयाने युनियन जिमखान्याची याचिका फेटाळल्यानंतर संरक्षण विभागाने जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

गोळीबाराच्या घटनेनंतर या कारवाईला वेग आला आणि अखेर लष्करी जवानांच्या उपस्थितीत जागा अधिकृतपणे ताब्यात घेण्यात आली.

डिफेन्स इस्टेट ऑफिसर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात युनियन जिमखान्याची जागा संरक्षण विभागाच्या ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*