LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
National News

*बेळगावात अग्निवीर भरती रॅली; 7 ऑगस्टपासून अर्जदारांसाठी मोठी संधी*

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे 7 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत युनिट मुख्यालय कोटा (UHQ) अंतर्गत अग्निवीर भरती रॅली आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होणाऱ्या या भरती प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लर्क आणि अग्निवीर ट्रेड्समन पदांसाठी पात्र उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

ही भरती विशेषतः युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या विधवा व पाल्यांसाठी, सेवेत असलेल्या तसेच माजी सैनिकांच्या पत्नी, पुत्र व भावांसाठी, गुणवंत क्रीडापटूंसाठी आयोजित करण्यात आली आहे. म्युझिशियन ट्रेड मात्र सर्व पात्र उमेदवारांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.

1 ऑक्टोबर 2025 रोजीचे वय 17 वर्षे 6 महिने ते 22 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय तपासणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन (CEE) ला उपस्थित राहावे लागणार आहे.

पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि भरती प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*