LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

3 लाखांच्या कर्जावर 18.60 लाखांचे व्याज; तरीही धमक्या... बेळगावात दोघे अटकेत

3 लाखांच्या कर्जावर 18.60 लाखांचे व्याज; तरीही धमक्या... बेळगावात दोघे अटकेत

बेळगाव | D Media

बेळगाव जिल्ह्यात बेकायदेशीर मीटर व्याजाच्या व्यवहारांवर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. कर्जाच्या मोबदल्यात लाखो रुपयांची व्याजवसुली करूनही आणखी पैशांसाठी कर्जदाराला धमक्या देत मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात समोर आला आहे.

रायबाग तालुक्यातील रोहिदास गल्ली येथील विठ्ठल तुकाराम माने यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी काही काळापूर्वी 3.10 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत 18.60 लाख रुपये व्याजापोटी अदा केले. मात्र एवढी मोठी रक्कम भरल्यानंतरही आरोपींकडून आणखी पैशांची मागणी सुरूच होती. पैसे न दिल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देत सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान आदित्य अशोक भोसले आणि अभिषेक अशोक भोसले यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या प्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेकायदेशीर सावकारी आणि मीटर व्याजाच्या व्यवहारांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

कर्जदारांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या अशा बेकायदेशीर सावकारीविरोधात नागरिकांनी निर्भयपणे तक्रार करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*