LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*पाणी भरताना विजेचा धक्का; सांबरामध्ये सातवीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू*

बेळगाव : तालुक्यातील सांबरा गावात आज शुक्रवार, २ जानेवारी रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या एका भीषण अपघातात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

परिणीती चंद्रकांत पालकर (वय १२, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी गावात नियमित पाणीपुरवठा सुरू असताना घरातील विद्युत मोटारीद्वारे पाणी भरले जात होते. पाणी भरल्यानंतर परिणीतीने मोटारीचा स्विच बंद केला; मात्र मुख्य विद्युत बटन बंद न करताच गॅलरीतील वायर ओढण्याचा प्रयत्न केल्याने तिला अचानक जोरदार विजेचा धक्का बसला.

या धक्क्याने परिणीती जागीच कोसळली. घटनेच्या वेळी तिची आई गावाबाहेर गेली होती, तर वडील कामानिमित्त बाहेर होते. प्रकार लक्षात येताच शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेत मुख्य वीजपुरवठा बंद केला व तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच वाटेत तिचा मृत्यू झाला.

परिणीती ही गावातील मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे पालकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या पश्चात आई-वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

या घटनेची नोंद मारीहाळ पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी अपघातामुळे घरगुती विद्युत उपकरणांच्या वापरात सुरक्षिततेचे नियम पाळण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*