LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

गो-हत्त्या बंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी विहिंप-बजरंग दल आक्रमक

बेळगाव : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गो-हत्त्या बंदी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या बेळगाव शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन सोमवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर करण्यात आले.
संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात बेळगाव जिल्ह्यात गाईंची तस्करी आणि बेकायदेशीर गो-हत्यांच्या घटना सातत्याने समोर येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कर्नाटक पशु हत्या प्रतिबंधक आणि संरक्षण कायदा २०२० अस्तित्वात असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
निवेदनात हिंदू समाजात गायीला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विशेष स्थान असल्याचे नमूद करत गो-हत्येमुळे धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे म्हटले आहे. तसेच गोपालन आणि गोसंवर्धनासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून विशेष योजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर गो-मांस विक्री आणि गाईंच्या वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पोलीस विभाग, परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणांना गो-हत्त्या बंदी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली.
निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काही धर्मगुरू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*