न्यूज अँकर शुभदा कुलकर्णी यांचे निधन
बेळगावच्या सुप्रसिद्ध गायिका आणि सेंट झेवियर्स हायस्कूलच्या माजी शिक्षिका शुभदा कुलकर्णी यांचे आज मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास आजारपणामुळे वेणूग्राम हॉस्पिटल येथे निधन झाले.
उत्तम गायिका म्हणून सुपरिचित असलेल्या शुभ कुलकर्णी सेंट झेवियर्स हायस्कूलमध्ये हिंदीच्या शिक्षिका होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालक म्हणून भूमिका बजावली होती.
शहरातील एका खाजगी वृत्तवाहिनीसाठी त्या निवेदका म्हणूनही काम करत होत्या. शुभा कुलकर्णी यांचे पार्थिव हॉस्पिटलमधून थेट अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीकडे नेले जाणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून समजते.