*कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर गुणवत्ता पारितोषिक सोहळा संपन्न*
*_ _मराठी शाळा नं 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघाने *कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर प्रथम स्मृतीदिनानिमीत्त गुणवंत विद्यार्थ्याना पुरस्कार .._*
येथील मराठी शाळा क्रमांक 5 येथे गुरूवार (ता.21) रोजी कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार असा सोहळा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चव्हाट गल्लीचे जेष्ठ नागरिक व कै यळ्ळूरकरांचे मित्र श्री एल. एस पवार होते. यावेळी ॲड. किसन यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ विविध प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान बक्षिस व पारितोषिक देऊन करण्यात आला.. यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी ॲड. किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मृतीस उजाळा दिला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दीपक किल्लेकर व श्री रवी नाईक यांनी यळ्ळूरकर साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. व माजी विद्यार्थी संघाच्या उपक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करत असलेल्या श्रीकांत कडोळकर व त्यांना उपयोगी पुस्तके प्रदान केलेल्या प्रा MM जाधव यांचा उल्लेख केला.
यानंतर प्रमुख वक्ते श्री उपेंद्र बाजीकर सर यांनी विद्यार्थीना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याचा फायदा व इतरांना न पाहता मातृभाषेतील शिक्षण घेतलं याच कौतुक केलं व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री अमर यळ्ळूरकर साहेबांनी आपली शाळेविषयीची आपुलकी व दृढसंकल्प व्यक्त केला. व आपल्या कैलासवासी वडिलांनी जो पाच नंबर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन कौतुक करत होते तोच पायंडा यापुढेही यळ्ळूरकर कुटुंबीय चालवू तसेच शाळेच्या कोणत्याही अडचणीचे वेळेला आम्ही ठामपणे उभे राहू अशी ग्वाही दिली. त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री एल. एस. पवार सर यांनी देखील श्री यळ्ळूरकर साहेबांच्या हृद्ध आठवणींना उजाळा दिला.
आजच्या कार्यक्रमास पालक वर्ग आणि शिक्षणप्रेमींची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती. प्रामुख्याने येळूरकर कुटुंबीय, प्रवीण जाधव, श्री मेलगे, डॉ बेळगावकर,sdmc अध्यक्ष अष्टेकर, सेंट्रल हायस्कूलचे मुख्याध्यापक हसबे सर ऍड धमुने, विजय पाटील आदी
सर्व शिक्षक वर्गाने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले . प्रास्ताविक पाटील सर यांनी केले. सूत्रसंचालन पी. ए. माळी सर केले. मुख्याध्यापक मुच्चंडीकर सरांनी एकूण कार्यक्रमाचा आढावा घेऊन सर्व उपस्थितांचे आभार मानले..