This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

July 2024
S M T W T F S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

| Latest Version 9.4.1 |

DevotionalLocal News

*डॉ संजय पंतबाळेकुंद्री यांना जीवन गौरव पुरस्कार*

*डॉ संजय पंतबाळेकुंद्री यांना जीवन गौरव पुरस्कार*
D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दि.१३- अध्यात्मिक सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील निस्सीम, निःस्वार्थ व उल्लेखनीय सेवेबद्दल ‘श्री पंत भक्त मंडळ’-मुंबई, यांच्या मार्फत डॉ.संजय पंतबाळेकुंद्री यांना २०२३ सालचा मानाचा “जीवन गौरव पुरस्कार २०२३”व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

अभ्युदय एज्युकेशन सोसायटी सभागृह, काळाचौकी -मुंबई येथे श्री गुरु पोर्णिमा वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या सन्मानाचे वितरण करण्यात आले.या मेळाव्यास दत्त संस्थान ट्रस्टी श्री.संजीव पंतबाळेकुंद्री, श्री पंतभक्त मंडळ- मुंबई विभागाचे अध्यक्ष महेंद्र,भोसले, भीमराव तिप्पे, विश्वनाथ डाकवे, दत्ता सातोसे,महेंद्र सातोसे, सदाशिवराव भोसले, भालचंद्र वांगणेकर,जयेश रेवळेकर, बाळ पाटील, आदित्य कडू, इत्यादि मान्यवर प्रामुख्याने विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते*.

*यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुर्ला ,अपोलो मिल,शिवकृपा संकुल-करीरोड , डिलाई रोड, लालबाग ,परेल, ठाणे, नाशिक, गारगोटी, अशा विविध विभागातून या कार्यक्रमास गुरुबंधूंची मोठी उपस्थिती होती*.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
D Media 24