This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

October 2024
S M T W T F S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*वडगांव अल-मदद कमिटी तर्फे स्वतंत्रा दिवस साजरा*

*वडगांव अल-मदद कमिटी तर्फे स्वतंत्रा दिवस साजरा*

वडगांव अल-मदद कमिटी तर्फे स्वतंत्रा दिवस साजरा

बेळगाव    वडगांव -बेळगांव मधील गोर-गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी स्थापित करण्यात आलेली वडगांव निजामिया अल-मदद कमिटी आणि वेलफेर ट्रस्ट तर्फे भारतीय स्वतंत्रा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजसेवक फैयाज सौदागर आणि बाबू मुजावर हे प्रमुख अतिथी पदी उपस्थित होते. अध्यक्षस्थान कमिटीचे अध्यक्ष आरिफ मुरगोड यांनी भूषवले होते.

प्रमुख अतिथी समाजसेवक फैयाज सौदागर यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आला. राष्ट्रगीता नंतर प्रमुख अतिथी फैयाज सौदागर म्हणाले की देश स्वतंत्र झाला,परंतु जो पर्यंत माणसांच्या मूलभूत गरजा समस्या मुक्त होत नाहीत तोपर्यंत आम्ही खरी स्वतंत्रता अनुभवता येत नाही.म्हणून सर्व समाज सेवकांनी गरजू लोकांना मदत करून त्यांना स्वतंत्र समस्या मुक्त असे जीवन दिले पाहिजे.यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि वडगांवच्या लोकांना स्वतंत्रा दिनाच्या निमित्ताने मिठाई -पदार्थाचे वाटप करण्यात आले.

या समारंभाला वडगांव अल-मदद कमिटीचे उपाध्यक्ष मुजफ्फर नदाफ, इम्रान मुरगोड ,इमामहुसेन धारवाडकर,वाहिद सनदी, इब्राहिम हुक्केरी,इरफान जमादार, अशपाक मदरंगी,समीउल्ला सौदागर,मलीक बिजापूरे,सलीम माणगांवकर,शमा,मलीक ,अय्याज जकाती,रसुल सनदी, इस्माईल पठान आदि सदस्य,विद्यार्थि आणि वडगांव मधील नागरीक उपस्थित होते.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply