This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

May 2024
S M T W T F S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*लाखो रुपयांचा अवैध दारू साठा जप्त*

D Media 24
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एखाद्या चित्रपटांमध्ये दाखवलेल्या दृश्यप्रमाणेच आज बेळगाव मध्ये एक दृश्य पाहायला मिळाले. अबकारी खात्याच्या पोलिसांनी कारवाई करत ट्रकमध्ये दडवून ठेवले 10 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला यावेळी प्लायवूड ने भरलेल्या फळ्यांमध्ये ट्रक चालक गोव्याहून अन्य मार्गे हा प्लायवुड करून असलेला ट्रक घेऊन जात होता.यामध्ये लाखो रुपयांचा अवैध दारू साठा असल्याची माहिती अबकारी खात्याला एका खबरीने दिली.

त्यानंतर त्यांनी कारवाई करत हलगा गावानंजीत सुवर्ण विधानसभेच्या पुढे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक मध्ये भरलेल्या प्लायवूडच्या फळांमध्ये दडवून ठेवलेला लाखो रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला ही घटना काल रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले. सकाळी प्रसारमाध्यमांसमोरच ट्रकची पाहणी करण्यात आली यावेळी ट्रक मध्ये भरलेल्या प्लायवूडच्या मोठ्या फळांच्या साठ्यामध्ये आतील बाजूस प्लायवूड कापून निर्माण केलेल्या दोन मोठ्या कप्प्यांमध्ये महागड्या उंची दारूच्या बाटल्यांचा साठा आढळून आला.

एखाद्या चित्रपटामध्ये दाखविलेल्या प्रसंगाप्रमाणेच हा प्रसंग सुद्धा सर्वांनी अनुभवला. बाहेरून कोणालाही समजणार नाही अशा पद्धतीने दारूच्या बाटल्यांचे बॉक्स प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवून ठेवण्यात आल्या होत्या यामध्ये ब्लेंडर स्प्राईड सिग्नेचर तसेच विविध प्रकारच्या महागड्या उंची दारूंचा समावेश होता.

याप्रसंगी अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत अवैध दारू साठा जप्त केला. बेळगावमध्ये झालेल्या सर्व कारवाई मध्ये आजपर्यंतचा हा सर्वात मोठा दारू साठा असल्याचे याप्रसंगी अधिकाऱ्यांनी सांगितले.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now