This is the title of the web page
This is the title of the web page

Live Stream

December 2024
S M T W T F S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

| Latest Version 9.4.1 |

Local News

*डॉ. सोनाली सरनोबत: पक्ष जे काही सांगेल ते मी प्रामाणिकपणे करीन.*

*डॉ. सोनाली सरनोबत: पक्ष जे काही सांगेल ते मी प्रामाणिकपणे करीन.*
D Media 24

डॉ. सोनाली सरनोबत: पक्ष जे काही सांगेल ते मी प्रामाणिकपणे करीन.

 

बेळगाव : खानापूर मतदारसंघातून उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि भाजपच्या बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षजे काही देईल ते प्रामाणिकपणे करू, असे सांगितले आहे.

‘खानापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी तिकीट मागितले होते. मी संपूर्ण मतदारसंघात पक्षाचे संघटन केले आहे. मी संपूर्ण मतदारसंघात फिरून भाजप सरकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. वस्त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला आहे. वीज जोडणी नसलेल्या गावांना वीज देण्याचे काम मी केले आहे. घरपोच रेशन पोहोचवण्याची व्यवस्था मी केली आहे. मी गावोगावी आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत. मी चोवीस तास जनसंपर्क कार्यालय सुरू केले असून हजारो लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे.

परंतु तेथे विठ्ठल हाळगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मला तिकीट न मिळाल्याने माझे समर्थक नाराज होते. मी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली आणि त्या सर्वांना शांत केले. सर्वजण नेहमीप्रमाणे भाजपसाठी काम करतील, असे आम्ही ठरविले आहे.

खानापूरसह जिल्ह्याच्या कोणत्याही भागात भाजपसाठी काम करण्यास मी तयार आहे. पक्षाने माझ्यावर सोपवलेली कोणतीही जबाबदारी मी पार पाडेन. आगामी काळात जिल्ह्यात पक्ष अधिक बळकट होईल. राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेवर येईल, असा विश्वास डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केला.


Independent Journalism Can’t Be Independent Without Your Support, Contribute By Clicking Below.

Leave a Reply